भोपाळ-मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणूक होत आहे. दरम्यान भाजपचे उमेदवार देवीसिंह पटेल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज निधन झाले आहे. राजपूर विधानसभा मतदार संघातून ते भाजपचे उमेदवार होते. त्यांच्या निधनामुळे कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. आज सकाळी त्यांना हृदय विकाराचा झटका आला. रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यापूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली होती. देवीसिंह चार वेळा राजपूरमधून विधानसभेवर निवडून गेले आहे. २०१३ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. ७ वेळा त्यांनी विधानसभा निवडणूक लढविली, त्यात ते चार वेळा विजयी झाले होते.