मंदसौर – मध्य प्रदेशातील मंदसौरजवळील धामनिया गावात झालेल्या एका अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला तर ३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. मंदसौरजवळील धामनिया गावाजवळ एक खासगी बस उलटल्याने हा अपघात घडला. अपघातानंतर स्थानिकांनी पीडितांना तत्काळ मदत उपलब्ध करून दिली. हा अपघात एवढा भीषण होता, की बस उलटल्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली यामुळे अघात आणखीनच जबरदस्त झाला. गाडीतील सर्व सामानाचाही चक्काचूर झाला. घटनेनंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वना केले. शिवराज यांनी अपघातानंतर ट्विट करत, मंदसौरमध्ये धामनिया गावाजवळ गाडी उलटून झालेल्या अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहिली. ईश्वर चरणी प्रार्थना, की मृतांच्या आत्म्याला शांती आणि शोकाकुल कुटुंबीयांनी बळ मिळो, असे म्हटले आहे.
मंदसौर में धामनिया गाँव के पास यात्री बस पलटने की दुखद घटना के मृतकों को श्रद्धांजलि। ईश्वर से प्रार्थना है कि दिवंगत आत्माओं को शांति और शोकाकुल परिजनों को संबल प्रदान करें। घायलों को शीघ्र स्वास्थ्य लाभ मिले।
— ShivrajSingh Chouhan (@ChouhanShivraj) April 29, 2018