भोपाळ-मध्य प्रदेशचे १८ वे मुख्यमंत्री म्हणून कॉंग्रेसचे कमलनाथ यांनी शपथ घेतली आहे. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी त्यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, चंद्राबाबू नायडू, शरद पवार, एम.के.स्टालिन, नवज्योतसिंग सिद्धू, कुमारस्वामी, एच.डी.देवेगौडा आदी उपस्थित होते.
फक्त मुख्यमंत्र्यांनीच यावेळी शपथ घेतली. बाकी मंत्र्यांचा शपथविधी नंतर होणार आहे. यावेळी विरोधकांनी मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन केले. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी विरोधकांच्या या एकजूटीकडे लक्ष लागून होते.