राज्यपाल सांगतात मत मिळविण्याची पद्धत

0

भोपाळ – राज्यपाल हे घटनात्मक पद असून राज्यपाल कोणत्याही राजकीय पक्षाचे जाहीररीत्या समर्थन करू शकत नाही. मात्र मध्यप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी चक्क भाजप कार्कार्त्याला मत कशी मिळवली याबाबत सल्ला देत आहे. यासंबंधी व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. मत मिळविण्यासाठी लोकांच्या घरी जावे लागते. त्यांच्या मुलाबाळांविषयी विचारपूस करावी लागते असे ते सांगत आहे.

राज्यपाल आनंदीबेन पटेल सतना शहराच्या दौऱ्यावर होत्या. त्यावेळी भाजप जिल्ह्याध्यक्ष नरेंद्र त्रिपाठी, सतनाच्या महापौर ममता पांडे, आमदार शंकरलाल तिवारी उपस्थित होते. भाजप कार्यकर्त्यांशी बोलताना गुजरातच्या माजी मुख्यमंत्री असलेल्या आनंदीबेन यांना आपल्या घटनात्मक पदाचा काही काळापुरता विसर पडला आणि कार्यकर्त्यांची कडक शब्दात हजेरी सुरू केली.

आनंदीबेन यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातील विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी आनंदीबेन भाजपच्या एजंट म्हणून काम करत असल्याचा आरोप केला आहे. याविरोधात राष्ट्रपतींकडे तक्रार करणार असल्याचे देखील म्हटले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आनंदीबेन आणि भाजप अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.