लव जिहाद विरोधी कायद्याला मध्य प्रदेश सरकारची मंजुरी

0

भोपाळ: मध्य प्रदेश सरकारने ‘लव जिहाद विरोधी’ धर्म स्वातंत्र्य विधेयक २०२०’ला मंजुरी दिली आहे. नव्या कायद्यात १९ तरतुदी आहेत. त्यामुळे आता धर्म परिवर्तन प्रकरणात पीडित बाजूच्या कुटुबीयांनी तक्रार दाखल केल्यास पोलीस कारवाई करतील अशी माहिती गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिली.

एखाद्या व्यक्तीने दिशाभूल करून अल्पवयीन, अनुसूचित जाती/जमातीच्या मुलीशी विवाह केल्याचा आरोप सिद्ध झाल्यास त्याला २ ते १० वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. ‘२८ डिसेंबरपासून विधानसभेच्या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्यावेळी हे विधेयक सदनासमोर ठेवण्यात येईल,’ असे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशच्या कॅबिनेटने यापूर्वी लव जिहादविरोधी अध्यादेशाला मंजुरी दिली. या अध्यादेशातील तरतुदींनुसार विश्वासघाताने धर्म बदलल्यास १० वर्षांपर्यंतची शिक्षा होईल. याशिवाय धर्म परिवर्तन करण्याच्या २ महिने आधी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती द्यावी लागेल. आमिष, दबाव, धमकीच्या आधारे होणारे विवाह रोखण्यासाठी लव्ह जिहादविरोधी नवा कायदा आणण्याची घोषणा उत्तर प्रदेश सरकारने केली होती.