मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा

0

पंढरपूर: महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर येथे आज आषाढी एकादशी निमित्त आज मोठी यात्रा भरली आहे. त्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे महापूजा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दुष्काळाच्या फेऱ्यात शेतकरी अडकलाय तो सुखी व्हावा, असे साकडे घातल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विठ्ठल मनातील भावना जाणतो, माझा महाराष्ट्र सुजलाम, सुफलाम व्हावा असे साकडे त्यांनी घातले असल्याचे सांगितले.

गेल्यावर्षी काही कारणास्तव महापूजा करायला मिळाली नाही, याची खंत नाही, विठ्लाच्या मनातच असेल पुढील वर्षी येईन तेव्हा सत्कार होईल. त्या मुळे वर्षा बंगल्यावर पूजा करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी बोलून दाखवली. भीमा-चंद्रभागेच्या स्वच्छतेचा प्रकल्प सुरू केला आहे. काम मोठे आहे, पण पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

परंपरेप्रमाणे दरवर्षी मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान एका वारकरी दाम्पत्याला मिळत असतो. हा मान यंदा लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातल्या सांगवी सुनेवाडी तांडा गावातील वारकरी दाम्पत्य विठ्ठल चव्हाण आणि प्रयाग चव्हाण यांना मिळाला.