दुपारी ३ वाजेपर्यंत महाराष्ट्रात ४३ टक्के मतदान !

0

मुंबई: राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाले आहे. दरम्यान दुपारी ३ वाजेपर्यंत महाराष्ट्रात ४३ टक्के मतदान झाले आहे. यात नंदुरबार जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे तर ठाणे सर्वात कमी मतदान झाले होते. ११ वाजेपर्यंत मतदानाला संथ प्रतिसाद होता. मात्र त्यानंतर प्रतिसाद वाढला असून आता मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा लागल्या आहेत.

दुपारी १ वाजेपर्यंत २१ टक्के मतदान झाले होते. त्यात जळगाव २७.२३, अकोला २०, वाशीम ३१, अमरावती १६, नागपूर २५, भंडारा २७, लातूर १२, नाशिक १७, जालना २४, रायगड २०, गोंदिया २७, चंद्रपूर २०, यवतमाळ २४, नांदेड २५, हिंगोली २७, परभणी १७, बीड २१ टक्के मतदान झाले होते.