मुंबई: राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाले आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रात ५४.५३ टक्के मतदान झाले आहे. यात नंदुरबार जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे तर ठाणे सर्वात कमी मतदान झाले होते. दुपारपर्यंत मतदानाला संथ प्रतिसाद होता. मात्र त्यानंतर प्रतिसाद वाढला असून आता मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा लागल्या आहेत. जवळपास मतदानाची वेळ संपली असून अद्यापही रांगा लागल्या आहेत.