मुंबई : मराठा आरक्षणासाठी आज क्रांती दिनाचं औचित्य साधून ९ ऑगस्ट रोजी मुंबई, ठाणे वगळता राज्यभर बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान आज पुण्यात आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलकर्त्यांनी हिंसक मार्गाचा अवलंब करत तोडफोड करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी यावेळी जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलनकर्ते आक्रमक असल्याचे यावेळी पाहावयास मिळाले.
मुख्यमंत्र्यांचा फोटो असलेल्या फलकावर राग
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फलकावरील नाव बघून आंदोलकांना संताप अनावर झाला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचा फोटो असलेल्या फलकावर राग व्यक्त करत नुकसान केले.