मुंबई: विधानसभेसाठी भाजप-शिवसेनेची युती होणार की नाही याकडे संपूर्ण राज्याचेच काय तर देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी युती होणार असल्याचे जाहीर करत थोड्याच वेळात मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख याबाबत अधिकृत घोषणा करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना सांगितले. त्यामुळे युती होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
जागा वाटपावर देखील चर्चा झाली असून जवळजवळ जागा वाटप पूर्ण झाले आहे. महायुतीची घोषणा मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे करणार आहे. दोन्ही पक्ष पत्रक जाहीर करतील त्यानुसार युतीची घोषणा होईल.