मुंबई: कर्नाटक विधानसभेत आज भाजपचा अग्निपरीक्षा आहे. आज दुपारी ४ वाजता मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने राज्यपालांनी दिलेली १५ दिवसांची मुदत अमान्य करत, आज दुपारीच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले.
‘ऑपरेशन कमळ’
कर्नाटकात आज सत्ता स्थापनेच्या निर्णायक टप्प्याला ‘ऑपरेशन कमळ’ असे नाव देण्यात आले आहे. या स्पेशल ऑपरेशन टीममध्ये पक्ष श्रेष्टींकडून महाराष्ट्रातून मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांना पाचारण करण्यात आले आहे.
४७ मतदारसंघाची जबाबदारी
सत्तेची जुळवाजुळव करण्यासाठी आशिष शेलार आज सकाळी बंगळुरूच्या दिशेने स्पेशल चार्टर्ड विमानाने रवाना झाले आहेत. कर्नाटक निवडणुकीत आशिष शेलार यांच्याकडे ४७ मतदारसंघाची जबाबदरी होती. बंगळुरु ग्रामीण आणि शहर या भागात आशिष शेलार निवडणूक काळात तळ ठोकून होते.