अर्थसंकल्प: पहा विभागनिहाय तरतूदी !

0

मुंबई : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी आज अर्थसंकल्प सादर केला असून, फडणवीस सरकारने अनेक क्षेत्रात भरीव तरतुदी केल्या आहेत. चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर होत असलेल्या या अर्थसंकल्पात मोठी घोषणा होईल असे बोलले जात आहे. दरम्यान दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून ४५६३ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. २६ जिल्ह्यात ४४६१ कोटी अनुदान वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांची वीज खंडित न करण्याचा निर्णय सरकारने घेतला. १५१ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला. तसेच १६३५ चारा छावण्या राज्यभरात उभारण्यात आल्या. चारा छावण्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला.

शेळ्या-मेंढ्यांसाठी चारा छावण्या उभारण्यात आल्या. चारा छावण्यांसाठी ३० हजार हेक्टर जमीन करारावर घेण्यात आली आहे. जमिन महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती, कृषीपंपाच्या चालू वीज देयकात 33.5 टक्के सुट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्याकरीता टँकरद्वारे पाणीपुरवठा, टंचाई जाहिर केलेल्या गावात शेतक-यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे हे विशेष निर्णय घेण्यात आले आहेत.

विभागनिहाय तरतूद प्रस्तावित

  • 12 बलुतेदारांना सूक्ष्म, लघू उद्योगातून सक्षम करण्यासाठी 100 कोटींची तरतूद
  • नैसर्गिक आपत्तीच्या निवारणार्थ ६ हजार ४१० कोटी एवढी तरतूद अर्थसंकल्पात असून त्यानंतरही आवश्यकता भासल्यास सरकार अतिरिक्त निधी उपलब्ध करून देणार
    *साडेचार वर्षात २६० जलसिंचन प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता
    *८० टक्के दिव्यांग असणाऱ्यांना सरकार घर बांधून देणार
    *पत्रकार सन्मान योजनेत वाढ. आता ही रक्कम २५ कोटींवर
    *छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत ५०.२७ लाख खातेदारांसाठी २४ हजार १०२ कोटी मंजूर
    *गेल्या ४ वर्षांत १४० सिंचन योजना पूर्ण केल्या
    *दुष्काळी भागात मागेल त्याला शेततळे योजना सुरू
    *चार कृषिविद्यापीठांसाठी ६०० कोटींची तरतूद
    *जलयुक्त शिवार योजनेसाठी ८९४६ कोटींचा खर्च
    *जलसिंचन योजनेसाठी १ हजार ५३० कोटींची तरतूद
    *काजू प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी १०० कोटींचा निधी
    *१ लाख ६७ हजार शेततळ्यांची कामं पूर्ण
    *2019-20 साठी 30 हजार किमी रस्त्यांचे निर्माण करण्याचे उद्दीष्ट
    *नागपूर मुंबई समृद्धी दृतगती महामार्ग काम वेगात सुरू
    *सार्वजनिक बांधकाम विभागासाठी 16 हजार कोटींची तरतूद
    *कृषी पंप जोडण्यांसाठी 1875 कोटी तरतूद
    *नागपूरमध्ये औष्णिक विद्युत प्रकल्प 8460 कोटींची तरतूद
    *80 टक्के दिव्यांग असलेल्यांसाठी घरे बांधून देणार त्यासाठी 100 कोटी
    *तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी बस स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी 100 कोटी
    *सार्वजनिक आरोग्यासाठी 10579 कोटींची तरतूद
    *अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षासाठी 100 कोटी
    *विधवा परितक्त्यांच्या स्वयंरोजगारासाठी योजना बनवणार
    *अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद
    *ओबीसी मुला-मुलींच्या वसतिगृहाची बांधणी करण्याकरता दोनशे कोटी रुपयांची तरतूद