मंत्री छगन भुजबळ कोरोना पॉझिटीव्ह

0

नाशिक : राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा  मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती ठीक असून गेल्या 2 ते 3 दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्यानी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून ते कोरोना आढावा बैठक, साहित्य संमेलन आढावा बैठक तसेच इतरही अनेक बैठकांचे त्यांनी आयोजन केले होते. यामुळे त्यांच्या संपर्कात जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी आणि साहित्य संमेलनाशी संबंधित अनेक जण आले आहेत.

दरम्यान, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरामध्ये सोमवारी रात्रीपासून संचारबंदी लागू करण्याची घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत ही संचारबंदी लागू असेल. तसेच विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून १ हजार रुपये दंड आणि प्रसंगी गुन्हा दाखल करायचे आदेश पोलिसांना देण्यात आल्याचे भुजबळ यांनी सांगितले.