नवी दिल्ली: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे, दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अनोख्या शब्दात मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘एनर्जेटीक अॅण्ड डायनामीक सीएम’ अशा शब्दात मोदींनी फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आक्रमक, धडाडीचे नेते आहे. गेल्या पाच वर्षात त्यांनी महाराष्ट्रात विकासाची नवी उंची गाठली. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गरीबांच्या विकासासाठीही चांगले काम केले आहे. त्यांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो या आशयाचे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.