महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आधी सुरत, गोव्याला नव्हे, आधी अयोध्येला गेले असते : उद्धव ठाकरे

नागपूर : खरे रामभक्त असते, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आधी सुरत, गोव्याला नव्हे, आधी अयोध्येला गेले असते, अशी जहरी टीका माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

नागपूर येथे महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा झाली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘लक्ष्य’ केले.

“दर वेळेला माझ्यावर आरोप केला जातो, मी कॉंग्रेससोबत गेलो म्हणजे हिंदुत्व सोडलं का? कॉंग्रेसमध्ये कोणी हिंदु नाही का? मग संघाला देखील मला विचारायचंय, नेमकं तुमचं आणि भाजपचं चाललंय काय?” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.