” भोळे महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न “

दि.१ मे २०२३ रोजी दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात सहायक आयुक्त , समाज कल्याण कार्यालय जळगाव ‘सामाजिक न्याय पर्व २०२३’ अंतर्गत महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य मा डॉ आर पी फालक यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले , यावेळी महाराष्ट्र दिन हा कामगार दिन म्हणून साजरा करण्यात येतो याची कारण मिमांसा आपल्या मनोगतातून व्यक्त करतांना प्राचार्य डॉ आर पी फालक यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांसाठी केलेल्या कार्याविषयी माहिती देऊन, केलेल्या कामगारांसाठी कामगार कायद्यांविषयी उहापोह केला.. महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाचे संचलन क्रीडा संचालक प्रा. डॉ संजय चौधरी यांनी केले तर यशस्वीतेसाठी समान संधी केंद्र समन्वयक प्रा डॉ संजय बाविस्कर, महिला अधिकारी प्रा डॉ जयश्री सरोदे, प्रा एसडी चौधरी, प्रा दिपक जयस्वाल, श्री किरण पाटील , एन एस एस कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ आर बी ढाके, सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ जगदीश चव्हाण, प्रा डॉ माधुरी पाटील विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा आर डी भोळे,प्रा ए आर सावळे प्रा संगिता धर्माधिकारी तसेच महाविद्यालयीन प्राध्यापक -शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी यांनी परिश्रम घेतले.