यावल महाविद्यालयात महाराष्ट्रदिनी ध्वजारोहण

यावल प्रतिनिधी ।

येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व सामाजिक न्याय पर्व २०२३ यांच्या संयुक्त विद्यमाने ६३ व्या महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त महाविद्यालयाच्या प्राचायां डॉ. संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. सकाळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक जयवंतराव येवले व मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. अर्जुन पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे. प्रमुख वक्ते उपप्राचार्य प्रा. एम.डी. खैरनार यांनी महाराष्ट्र हे सुजलाम् सुफलाम् है राज्य आहे. महाराष्ट्र स्थापनेसाठी १०५ लोकांनी बलिदान दिले असे विशद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी मार्गदर्शन करताना महाराष्ट्र भूमी ही शिवाजी महाराज, संभाजी महाराजांची कर्मभूमी म्हणून नावाजलेली आहे. समर्थ रामदास व संत तुकाराम ह्या संत, महंताचे योगदान लाभलेलं राज्य आहे. त्यांचे विचार प्रत्येकाने आचरणात आणायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. एस.पी. कापडे यांनी केले. आभार कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. संजय पाटील यांनी मानले. यावेळी सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते.