महाराष्ट्रातील लॉकडाऊन पुन्हा वाढले

0

मुंबई: कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. गेल्या १० महिन्यापासून देशात लॉकडाऊन आहे. सुरुवातीला सर्व बंद होते. मात्र आता हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणलेली आहे. परंतु लॉकडाऊन सुरूच आहे. महाराष्ट्रातही लॉकडाऊन कायम आहे. दरम्यान महाराष्ट्रातील लॉकडाऊन पुन्हा वाढविण्यात आले आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत म्हणजे एका महिन्यासाठी पुन्हा लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

राज्यातील शाळा, महाविद्यालये सुरु झाले आहेत. सुरुवातीला ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरु झाले होते. आता ५ वी ते ८ वी चे वर्ग सुरु करण्यात आले आहे.

१ फेब्रुवारीपासून लॉकल सेवा देखील नियमित सुरु होणार आहे.