मुंबई: कॉंग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त असलेल्या विधान सभेच्या विरोधी पक्षनेते पदावर कॉंग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधान सभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज विधानसभेत ही घोषणा केली. त्यानंतर मुख्यमंत्री यांनी विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेत्याच्या जागेवर बसविले. राधाकृष्ण विखे पाटील यांनी 4 जून रोजी राजीनामा दिला होता. त्यानंतर हे पद रिक्त होते. विरोधी पक्षनेत्यांच्या निवडीनंतर मुख्यमंत्री यांनी विजय वडेट्टीवार यांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते दोन्ही विदर्भातील असण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असावी असे मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकडून विजय वडेट्टीवार यांच्या नावाची विरोधी पक्षनेते पदासाठी करण्यात आली होती.