BREAKING NEWS: विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटीलांचा राजीनामा !

0

अहमदनगर : काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राधाकृष्ण विखे पाटल यांनी राजीनामा दिल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. विखे-पाटील यांचा राजीनामा काँग्रेसने स्वीकारला आहेत. तसेच नगरची जिल्हा काँग्रेस कमिटी बरखास्त करण्यात आली आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मुलगा सुजन यांने भाजपमध्ये प्रवेश करत लोकसभा निवडणुक लढविली.

काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार अशी अहमदनगरमध्ये चर्चा रंगत होती. कारण त्यांचा मुलगा सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे राधाकृष्णही भाजपमध्ये दाखल होतील, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. १२ एप्रिल रोजी नगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. या सभेत राधाकृष्ण विखे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र, राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मोदींपासून काही अंतर राखले होते.

दरम्यान, त्यांनी येत्या तीन-चार दिवसात मोठा निर्णय घेणार असल्याचे विखे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना निरोप पाठवला होता. विखे यांच्या पत्नी आणि काँग्रेसच्या जिल्हा परिषद अध्यक्ष शालीनताई विखे पाटील मागील दोन ते तीन दिवसांपासून भाजपचे नगरमधील उमेदवार सुजय विखे यांचा उघडपणे प्रचार करत होत्या. त्यामुळे विखेंची अडचण अधिक वाढली होती. तसेच काँग्रेसने विखे पाटील यांच्याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले होते.