कोल्हापूर ।
महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे मंगळवारी कोल्हापूरमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्यावर आज कोल्हापूरमध्येच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती अरुण गांधी यांचे पुत्र तुषार गांधी यांनी दिली. अरुण गांधी हे माजी केंद्रीय मंत्रीही होते.
अरुण गांधी हे महात्मा गांधी यांचे नातू, तर मणिलाल गांधी यांचे पुत्र होते. त्यांचा जन्म १४ एप्रिल १९३४ रोजी डर्बनमध्ये त्यांचा जन्म झाला. ते आयुष्यभर गांधी विचारावर चालले. त्यांना लहानपणी महात्मा गांधी यांचा सहवास लाभला. त्यांनी त्यांच्यासोबत सेवाग्राम आश्रमात १९४६ सुमारास काही काळ घालवला. अरुण गांधी यांनी द गिफ्ट ऑफ एंगर : अँड अदर लेसन्स फ्रॉम माय ग्रैंडफादर महात्मा गांधीसह अनेक पुस्तक लिहिली. मात्र, १९८७ मध्ये ते कुटुंबासह अमेरिकेत स्थायिक झाले होते. अमेरिकेत त्यांनी एका संस्थेची स्थापना केली. ती गांधी विचाराचा प्रचार आणि प्रसार करते. अरुण गांधी गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरमध्ये अवनी संस्थेच्या अध्यध्य अनुराधा भोसले यांच्या घरी हणबरवाडी येथे वास्तव्यास होते. येथेच त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे.