महात्मा ते भारतरत्न व्याख्यानमाला संपन्न

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना प्राचार्य डॉ एस व्ही पाटील सोबत उपस्थित प्राध्यापक बंधू-भगिनी

भुसावळ येथील कला , विज्ञान पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील नियोजन अभ्यास मंडळ व अर्थशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती पासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पर्यंत व्याख्यानमाला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मानवाच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणारे स्वतःसाठी नाही तर देशासाठी लढणारे आधुनिक निर्माते शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार लिखाण ग्रंथ संपदा प्रचंड अफाट असून ते एक स्वाभिमानी विद्याशील आणि चरित्रशील होते अशी भावना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रमुख वक्ते डॉ. एस. पी.झनके यांनी व्यक्त केली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही.पाटील तसेच प्रमुख पाहुणे उपप्राचार्य डॉ.बी.एच.ब-हाटे,डॉ. एन. ई. भंगाळे, डॉ. ए.डी गोस्वामी तसेच नियोजन अभ्यास मंडळाचे चेअरमन डॉ. एस.टी.धुम तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. आर.एस.नाडेकर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्या विद्यार्थ्यांनी बक्षीस मिळविले त्यांना “महाराष्ट्राची आर्थिक पाहणी” हा ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले.त्यात प्रथम क्रमांक खुशी राजेंद्र चव्हाण, द्वितीय क्रमांक रूपाली दिगंबर वानखेडे, तृतीय क्रमांक शिंदे अर्चना सोपान यांनी पटकावला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एस.व्ही.पाटील सर यांनी समारोप केला त्यात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना उजाळा दिला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार इतके गहन आहे की 40-40 वर्ष अभ्यास करूनही ते कळले नाही. डॉ.बाबासाहेबांनी संविधान सादर केले.त्यावेळेस पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला बाबासाहेब या घटनेबद्दल आपले काय मत आहे. त्यावर बाबासाहेबांनी उत्तर दिले या घटनेचा वापर ज्यांच्यासाठी घटना आहे त्यांनी कसा करायचा त्यावर अवलंबून आहे.बाबासाहेब एक नाही दोन नाही तर 64 विषयांचे तज्ञ होते. अशी माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ललित तायडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. अक्षरा साबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.एस.टी. धुम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. डॉ. किरण वारके. प्रा. व्ही. ए .सोळुंके, प्रा.शितल सोनवणे, प्रा. नीता पाटील प्रा. जे.पी अडोकार यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला अर्थशास्त्र विषयाचे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.