महाविकास आघाडीचा जागावाटप फॉर्म्युला ठरला? यादी पाहाच..

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने तयारी सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून लोकसभेच्या जागावाटपावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. त्यात आता लोकसभा निवडणुकीत मविआच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास ठरल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ४८ जागांपैकी शिवसेना ठाकरे गटाला १६, राष्ट्रवादी काँग्रेसला १८ तर काँग्रेसला १४ जागांवर निवडणूक लढवेल असं सांगण्यात येत आहे. मुंबईतील ६ जागांपैकी शिवसेना ठाकरे गटाला ४ तर काँग्रेसला २ जागा लढण्यास मिळू शकते.

दरम्यान, २०१९च्या आकडेवारीनुसार, ४८ जागांपैकी भाजपानं २३, तत्कालीन उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं १८, राष्ट्रवादी काँग्रेसनं ४ तर काँग्रेस आणि एमआयएमनं प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला होता.