जामनेर। येथील विज वितरण कंपनीचे तंत्रज्ञ आपल्या सहकारी कर्मचार्यांसोबत वसुलीसाठी गेले असता. त्यांच्या विरोधात मुजोरी करीत तंत्रज्ञ यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला. शहरासह परीसरात थकबाकीदार विज ग्राहकांकडून थकीत वसूली वसूल करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे.
याप्रमाणे शहरातील स्रिरामपेठ परीसरात विज तंत्रज्ञ प्रतीक पाटील हे सहकारी कर्मचारी यांच्यासोबत शेख लाल,शेख महबुब यांच्याकडे वसूलीसाठी आले असता संबधीत विज ग्राहकाचा नातेवाईक शेख जमीर,शेख नईम व तंत्रज्ञ प्रतीक पाटील यांच्यात वसुलीवरून भांडण झाले. पाटील यांना शेख जमीर,शेख नईम याने धक्काबुक्की केला असल्याचा आरोप करीत प्रतीक पाटील यांनी जामनेर पोलीस ठाण्यात शेख जमीर,शेख नईम विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. कर्मचार्यांना गणवेश दिला असल्यावरही काही कर्मचारी गणवेश घालत नसल्याने वसूली करतांना समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळेच आज विज वितरण कंपनीचे प्रतीक पाटील यांनी वसुलीला जातांना गणवेश न घातल्याने धक्काबुक्की सारख्या प्रकाराला तोंड देवूनही .शासकिय कामात अडथळा म्हणून सारखा गुन्हाही ते सदर संशयीता विरुध्द नोंदवू शकले नाही.