रांची: आज १७ व्या लोकसभेसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान होत आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाले आहे. दरम्यान आयपीएलमध्ये व्यस्त असतांना देखील भारतीय क्रिकेट संघाचा धडाखेबाज खेळाडू महेंद्रसिंग धोनीने रांचीतील जवाहर विद्या मंदिर शाळेत जाऊन मतदान केले. यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या मातोश्री आणि पत्नी साक्षीही होती. त्यांनीही मतदान केले.