समाजात जातीय सलोखा राखा ; सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकू नका – जालिंदर पळे

सावदा (प्रतिनिधी) – राज्यातील काही शहरांत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इंस्टाग्राम, फेसबुक, व्हाट्सप, ट्विटर अथवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चुकीची वक्तव्य / कमेंट कोणत्याही नागरिकांनी करु नये तसेच दोन धर्म समाज गट पक्ष व्यक्ती समुदाय यांच्या धार्मिक भावना दुखवतील या पद्धतीने पोस्ट किंवा वक्तव्य करू नये तसेच व्हाट्सपच्या माध्यमातून असे केल्याचे निदर्शनास
आल्यास ग्रुप अडमिन व संबधित व्यक्ती आल्यास ग्रुप अडमिन व संबधित व्यक्ती येईल,
तसेच समाजामध्ये जातीय सलोखा कायम राहून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन सावदा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे यांनी केले आहे राज्यात काही ठिकाणी वेगवेगळ्या कारणांवरून जातीय तेढ, तणाव, दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सामाजिक ऐक्य धोक्यात आले असतांना समाज माध्यमातून आक्षेपार्ह संदेश पाठवून तणाव वाढवला जात आहे. सामाजिक सलोखा धोक्यात येईल किंवा कोणाच्याही धार्मिक भावना दुखावतील असा मजकूर समाज माध्यमात टाकू नये, तसे आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा जालिंदर पळे यांनी दिला आहे,
या सोबतच ऑन लाईन व्यवहार करतांना काळजी घ्या फसव्या पोस्टला बळी पडू नका बॅंके समबंधी व्यवहार करताना देखील काळजी घेण्याचे आवाहन पळे यांनी केले आहे