BREAKING: राज्यात पुन्हा महायुतीला बहुमत; एक्झिट पोलचा अंदाज !

0

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान संपले. मतदान संपल्यानंतर विविध वृत्त वहिनींनी एक्झिट पोलनुसार कोणाची सत्ता येणार याबाबत भाकीत वर्तविले आहे. दरम्यान राज्यात पुन्हा महायुतीला यश मिळणार असून महायुती सत्ता स्थापन करणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

एक्झिट पोलमध्ये महायुतीला १९२ ते २१६ जागा मिळतील असा अंदाज एबीपी सी व्होटर्सने वर्तविला आहे. तर न्यूज १८ लोकमतने २४० पेक्षा अधिक जागा महायुतीला मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. एबीपी सी व्होटर्सच्या अंदाजानुसार महाआघाडीला ६९-८१ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे तर न्यूज १८ लोकमतने एक्झिट पोलमध्ये महाआघाडीला ४०-४५ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.