मुंबई : मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून दुर्घटना होत असल्याचा प्रकार समोर येत आहे. दरम्यान सोमवारी रात्री मालाड पूर्व परिसरात असलेल्या पिंपरीपाडा येथील झोपडपट्टीवर भिंत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला आहे.
प्रशासनाणे या दुर्घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्थरीय समिती नेमली आहे. याठिकाणी प्रशासनाकडून मदतकार्य देखील सुरु आहे.