सुब्रमण्यम स्वामी यांच्या वक्तव्याने मालदीवचे भारताला समन्स

0

नवी दिल्ली-आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारे भाजपाचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या एका ट्विटमुळे केंद्र सरकार अडचणीत आले आहे. स्वामींनी मालदीवबाबत केलेल्या एका ट्विटमुळे भारताचा जुना सहकारी देश असलेला मालदीव नाराज झाला आहे. संतापलेल्या मालदीव सरकारने भारताचे राजदूत अखिलेश मिश्रा यांना समन्स पाठवले.

जर मालदीवमध्ये निवडणुकीच्या दरम्यान गडबड झाली तर भारताने त्यांच्यावर आक्रमण केले पाहिजे, असे ट्विट सुब्रमण्यम स्वामी २४ ऑगस्ट रोजी केले होते. स्वामी यांच्या या वक्तव्यावर भारत सरकारने टिप्पणी करण्यास नकार दिला होता. स्वामी यांचे ते वैयक्तिक मत आहे. अशावेळी कोणालाही काही बोलण्यापासून रोखता येणार नसल्याचे सरकारने म्हटले होते.