कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांची नियुक्ती

0

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये खांदेपालटाला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून वरिष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी मोहन प्रकाश यांच्याकडे राज्याची जबाबदारी होती. दिल्लीच्या वर्तृळात दीर्घकाळ वावर असलेल्या खरगे यांची मुरब्बी राजकारणी म्हणून ओळख आहे.


 

राज्यात पक्षाला सत्तेच्या शिखरावर पोहचविण्याची महत्वाची जबाबदारी खरगे यांच्यावर असेल. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात नवचैतन्य निर्माण करावे लागेल. तसेच पक्षांतर्गत असलेल्या गटबाजीला थोपविण्याचे मोठे आव्हान खरगे यांच्यासमोर असेल. समविचारी पक्षांची मोट बांधण्याच्या दृष्टीने खरगे यांना आपले राजकीय कौशल्य पणाला लावावे लागेल.

काँग्रेसने खरगे यांच्यासोबत अन्य तिघांवर सेक्रेटरी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहेत.

सोनल पटेल (गुजरात)
आशिष दुआ (हरयाणा)
संपथ कुमार (तेलंगणा)