मल्ल्या ‘फरार आर्थिक गुन्हेगार’ घोषित; संपत्ती जप्तीचा मार्ग मोकळा

0

मुंबई-भारतातील बँकांना हजारो कोटी रुपयांचा चुना लावून परदेशात फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्या याला ‘फरार आर्थिक गुन्हेगार’ घोषित करण्यात आले आहे. मुंबईतील न्यायालय आज निकाल दिला.

न्यायालयाने मल्ल्याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केल्याने त्याची संपत्ती जप्त करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मोठे आर्थिक घोटाळे, बँकांची फसवणूक यांसारखे मोठे आर्थिक गुन्हे उघडकीस आल्यास गुन्हेगार परदेशामध्ये पलायन करतात. अशा देशांकडून त्यांचे प्रत्यार्पण होणे, त्यानंतर खटले चालविणे यामध्ये खूप वेळ वाया जातो. अशा घोटाळेबाजांवर वचक निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने ‘फरारी आर्थिक गुन्हेगार कायदा, २०१८’ आणला आहे. या कायद्याअंतर्गत फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून जाहीर झाल्यास गुन्हेगाराच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई करण्याचा मार्ग मोकळा होतो.