इंग्लंडमध्येही विजय मल्ल्याला झटका

0

नवी दिल्ली-९ हजार कोटींचे कर्ज बुडवून देशाबाहेर पलायन केलेले मद्य सम्राट विजय मल्ल्या याला आता युकेच्या न्यायाधीशांनी आणखी एक दणका दिला आहे. भारतीय बँकांचा दीड अब्ज डॉलर्सचा दावा युके जजने वैध ठरवला आहे. विजय मल्ल्यासाठी हा निर्णय अत्यंत धक्कादायक आहे. या निर्णयामुळे विजय मल्ल्याला दर आठवड्याला २० हजार पाऊंड्सच बँकेतून काढता येणार आहेत. विजय मल्ल्याने मोठा घोटाळा केला आहे हे या बँकांनी स्पष्ट केले होतेच. हा दावा वैध ठरवल्याने विजय मल्ल्यासाठी हा मोठा झटका आहे यात शंका नाही.

विजय मल्ल्याच्या वकिलांनी या निर्णयानंतर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांसमोर दिलेली नाही. अँड्रूयू हेन्शा यांनी आपल्या निर्णयाविरोधात अपिल करण्यासही संमती दिलेली नाही. यामुळे विजय मल्ल्या यांच्या वकिलांना आता थेट न्यायालयात याचिकाच दाखल करावी लागण्याची शक्यता आहे. विजय मल्ल्याची संपत्ती गोठवण्याच्या मागणीला स्थगिती देण्यासही कोर्टाने नकार दिला आहे. असेही अँड्र्यू यांनी स्पष्ट केले आहे.


 

विजय मल्ल्याला लंडनमध्ये १८ एप्रिल २०१७ ला अटक करण्यात आली होती. तसेच त्यादिवशी विजय मल्ल्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती. ६,५०,००० पाऊंड च्या जामिनावर त्याची सुटका करण्यात आली होती. २०१६ मध्ये विजय मल्ल्या कर्ज बुडवून भारतातून पळून गेला. माझ्याविरोधात भारतात अन्यायकारक सुनावणी होईल असे सांगत विजय मल्ल्याने भारतात परतण्यास नकार दिला आहे. अशात लंडनच्या वेस्टमिनिस्टर कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे.