नवी दिल्ली: काल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. दरम्यान आज गुरुवारी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात ममता बॅनर्जी आणि मोदी-शहांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले होते. ममता बॅनर्जी आणि भाजपमधील वाद अगदी टोकाला पोहोचल्याचे दिसून आले होते. त्यामुळे ममता बॅनर्जी आणि अमित शहा यांच्या भेटीकडे विशेष लक्ष लागले आहे.
काल मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यात चर्चा झाली. यात ममता बॅनर्जी यांनी मोदींना पश्चिम बंगालचे नाव बदलून ‘बांगला’ करण्याबाबत विनंती केली होती.