मुंबई : भारतभरातील मातांसाठी अग्रगण्य बहुभाषीय सामग्री व्यासपीठ मॉमस्प्रेसोने आपली विस्तार योजना जाहीर केली आहे. प्रत्येक महिन्याला १० दशलक्ष भेटी घेणारी, मॉमस्प्रेसोची वाटचाल आर्थिक वर्ष २०२१ पर्यंत १५० कोटी रुपयांचा महसूल मिळविण्याच्या दिशेने आहे. वेगवेगळ्या भौगोलिक क्षेत्रामधील अधिक मातांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रादेशिक भाषेवर आणि प्रादेशिक सामग्रीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे पुढील ५ वर्षांमध्ये ७० टक्के भारतीय मातांना व्यासपीठावर आणण्याची योजना कंपनीने आखली आहे.