कोलकाता: काल तृणमूल कॉंग्रेसला पडलेल्या खिंडाराला रोखण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी जलद पावले उचलत आपल्या कॅबिनेटमध्ये फेरबदल केला आहे. काल तृणमूलचे दोन आमदार, आणि ५० नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला.
लोकसभा निवडणुकीत ममता यांच्या पक्षाला बंगाल मध्ये २२ जागा मिळाल्या असून, भाजपाला १८ जागा मिळाल्या आहे. लोकसभेच्या निमित्ताने बंगालमध्ये भाजपाने प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता ममता बॅनर्जी यांनी कॅबिनेटमध्ये फेरबदल केल्याचे सांगण्यात येत आहे. पश्चिम बंगालमध्ये ममताचे सरकार फार काळ टिकणार नाही असे विधान भाजपाचे राष्ट्रीय सचिव राहुल सिन्हा यांनी म्हटले आहे. त्यांनी पश्चिम बंगाल मध्ये सहा महिने ते एक वर्षाच्या आत निवडणुका होतील. हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार नाही. तृणमूल मध्ये नाराजीचे वातावरण असून, तृणमूल कॉंग्रेसचे सरकार पोलीस आणि सीआयडी यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप लावला आहे.
लोकसभा निकालानंतर बंगाल मधील राजकीय हालचालीना वेग आला आहे. काल ममता यांना धक्का देत तृणमूलचे दोन आमदार आणि ५० नगरसेवक यांनी भाजपाचा रस्ता धरला आहे. त्या मुळेच ममता यांनी आपल्या कॅबिनेट मध्ये बदल केला असल्याचे राजकीय क्षेत्रात बोलले जात आहे.