तमलूक: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधील तमलूक येथे प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली. पश्चिम बंगालला फनी चक्रीवादळाचा फटका बसला आहे. मात्र यावरून तेथे राजकारण होत आहे. चक्रीवादळाचा आढावा घेण्यासाठी ‘मी ममता दीदींना फोन केला मात्र त्यांनी माझ्याशी फोनवर बोलणे टाळले, ममता दीदी नैसर्गिक आपत्तीवरून राजकारण करत आहे’ असे आरोप मोदींनी केले. ममता दीदींना मोठा अहंकार असून त्यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहे अशी टीका मोदींनी केली.
काल पंतप्रधान कार्यालयातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधण्यात आले, मात्र ममता बॅनर्जी कार्यालयात नसल्याचे उत्तर पीएमओला देण्यात आले. पीएमओने पुन्हा संपर्क साधाल मात्र ममता बॅनर्जी यांनी प्रतिसाद दिला नाही असे सांगण्यात येत आहे. आज चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पीएमओ कार्यालयाने सुचविले असता ममता बॅनर्जी यांनी त्यास नकार दिले.