या वर्षातील पहिली ‘मन की बात’; मोदींनी विविध विषयांवर साधला संवाद !

0

नवी दिल्ली : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित फाईल्स सार्वजनिक केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ या कार्यक्रमा दरम्यान सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून याबद्दलची मागणी होत होती पण विद्यमान सरकारने हे करुन दाखवल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’चा आजचा हा ५२वा भाग आहे. या वर्षातली पहिली ‘मन की बात’ आहे. आजच्या मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान यांनी पद्म पुरस्कार, अर्थ संकल्प, तसे परिक्षा चर्चा याविषयांवर संवाद साधले.

लोकसभा निवडणूकीत देशवासियांनी मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. तरुण मतदारांनी स्वत:ची नोंदणी करुन मतदान करावे असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाबद्दलही माहिती दिली. निवडणूक आयोग ही आपल्या देशातील महत्त्वाची संस्था आहे. जी आपल्या प्रजासत्ताकपेक्षाही जुनी आहे. २५ जानेवारीला निवडणूक आयोग स्थापना दिवस होता. हा दिवस ‘राष्ट्रीय मतदाता’ म्हणून ओळखला जातो. ३० डिसेंबर २०१८ ला झालेल्या ‘मन की बात’मध्ये त्यांनी प्रयागराजमधील कुंभमेळ्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन देशवासियांना केले होते.