भोपाळ : मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथे क्रिकेट सामन्यादरम्यान मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार म्हणून खेळाडूला चक्क पाच लीटर पेट्रोल देण्यात आले. रविवारी क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात आला आणि त्यात सनरायझर्स 11 व शगीर तारिक 11 अशा दोन संघांमध्ये सामना झाला. सनरायझर्स 11ने हा सामना जिंकला, सलाउद्दीन अब्बासीला मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार देण्यात आला. त्याला मॅन ऑफ दी मॅच म्हणून अब्बासीला 5 लीटर पेट्रोलचा कॅन देण्यात आला. काँग्रेस नेता मनोज शुक्ला यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते आणि इंधन दरवाढीचा निषेध म्हणून त्यांनी ही युक्ती लढवली.
मनोज शुक्ला म्हणाले की,’ज्या वेगानं पेट्रोल व डिझेलचे भाव वाढत आहेत, ते पाहून आयोजन समितीनं मॅन ऑफ दी मॅच जिंकणार्या खेळाडूला 5 लीटर पेट्रोल देण्याचा निर्णय घेतला होता.” या अनोख्या प्रकाराची सर्वत्र जोरदार चर्चा आहे.