भुसावळ प्रतिनिधी l
शहरातील बस स्टैंड येथे सावदा जाण्याकरीता सुनीता पहाडे बसमध्ये चढत असतांना पर्स मधील लहान पाकीट व त्यामधील एक सोन्याचे मंगळसूत्र (१२ ग्रॅम) वजनाचे अठरा हजार रुपये किंमतीचे तसेच एक पॅडल व १२ मणी असलेले जुने वापरते तसेच एक सोन्याची अंगठी (४ ग्रॅम) वजनांची सहा हजार रुपये किंमतीची व अडीच हजार रुपये रोख असे एकूण सव्हीस हजार पाचशे रुपयांची मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीवाचून लबाडीच्या उद्देशाने चोरून नेला आहे म्हणून बाजारपेठ पोलीस स्टेशनला फिर्यादी सुनिता मुरलीधर पहाडे (वय ३८) राहणार कऊलखेडा, न्यू खैतान नगर, जैन मंदिर जवळ, अकोला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.