चार दिवसात ‘मणिकर्णिका’ने केली इतकी कमाई !

0

नवी दिल्ली-कंगना राणौतची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी’ २५ जानेवारीला प्रदर्शित झाला. प्रदर्शनानंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. रिलीजच्या चार दिवसांत या चित्रपटाने बक्कळ कमाई केली.

चार दिवसांत या चित्रपटाने ४७ कोटी रूपयांची कमाई केली आहे. काल सोमवारी दुस-या आठवड्याच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. चौथ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत ४१.७१ टक्क्यांची घसरण झाली.

रिलीजच्या पहिल्याच दिवशी धमाकेदार सुरुवात करत, या चित्रपटाने ८.७५ कोटी रूपये कमावले. यानंतर दुस-याचं दिवशी सगळ्यांना धक्का देत, थेट १८.१० कोटींवर झेप घेतली. रविवारी हा चित्रपट पाहायला प्रेक्षकांच्या रांगा लागल्या आणि या चित्रपटाने १५.७० कोटींची कमाई केली. सोमवारी या चित्रपटाने ५.१० कोटी कमावले. कमाईचा एकूण आकडा ४७.६५ कोटींच्या घरात आहे.

जाणकारांच्या सांगण्यानुसार या आठवड्या हा चित्रपट ६० कोटींपर्यंतचा पल्ला गाठू शकतो. या चित्रपटात कंगनाने झाशीची राणी लक्ष्मीबाईची भूमिका साकारली आहे. सोबतच या चित्रपटाचे दिग्दर्शनही तिने केले आहे.