नवी दिल्ली- केंद्रातील मोदी सरकार पायाभूत सुविधेत सुधारणा करण्यासाठी जोरात काम करत आहे. याचाच भाग म्हणून उत्तर-पूर्व देशांना भारताशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. उत्तर-पूर्वेकडील मणिपूर राज्यात १११ किलोमीटर लांबीची जिरीबाम-तुपुल-इंफाल रेल्वे लाईन तयार केली जात आहे. यात १३७ पूल तयार करण्यात येणार आहे. याच एक भाग असलेला ब्रिज नंबर १६४ लांबी १४१ मीटर आहे. दिल्लीच्या कुतुबमीनार पेक्षा दुप्पट उंची असलेला या ब्रिजला जगातील सर्वात उंच गार्टर रेल्वे ब्रिज म्हणून ओळखले जणार आहे.
सद्य स्थितीत 139 मीटर उंचीचा युरोपमधील माला-रिजेका वायाडक्ट हे जगातील सर्वात उंच ब्रिज आहे. ब्रिज नं. 164 मणिपुर राज्यातील नॉनीजवळील इजाई नदीवर तयार होत आहे. भारतीय रेल्वे हे ब्रिज तयार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील टेकनॉलोंजीचा वापर केला जाणार आहे. हे ब्रिज तयार करण्यासाठी ४०० कोटींचा खर्च येणार आहे.