मनीष सिसोदिया यांनी ‘या’ शब्दात केंद्र सरकारवर व्यक्त केली नाराजी

0

नवी दिल्ली-दिल्लीचे उपमुख्यमंत्री ‘आप’ नेते मनीष सिसोदिया यांना रशियातील मॉस्को येथे होणाऱ्या जागतिक शिक्षण परिषदेत आमंत्रित करण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्रातील सुधारणा या विषयावर त्यांचे विचार या परिषदेत मांडण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. ते या परिषदेला जाणारही होते, मात्र भारत सरकारने त्यांना मॉस्कोला जाण्यासाठी परवानगी दिली नाही. याबाबत त्यांनी ट्वीटरवरून खंत व्यक्त केली आहे.

दिल्लीच्या शिक्षण पद्धतीत केलेल्या सुधारणांची दखल घेत मॉस्को येथे मला आमंत्रित करण्यात आले होते. त्यासाठी भारत सरकारकडे मी परवानगी मागितली होती, मात्र १० दिवसांपासून ही मागणी प्रलंबित असून मला जाण्यास परवानगी देण्यात आली नाही असे सिसोदिया यांनी सांगितले आहे.

‘आप’चा नेता असल्याने त्यांचे नाव जगभरात होऊ नये यासाठी भाजप सरकारने त्यांना ही परवानगी दिली नसल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.