मनुदेवीच्या दर्शनापूर्वीचा तुकारामवाडीच्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

0

सहा मित्रांसमवेत दुचाकीवरुन गेला होता ; अंघोळीसाठी उतरला अन् पूलाखालील पाईपात पाय अडकून पाण्याच्या जोरदार प्रवाहाने गेला जीव

जळगाव : मनुदेवीच्या दर्शनापूर्वी मार्गातील तिसर्‍या क्रमांकाच्या नदीत अंघोळ करण्याचा मोह आवरला नाही. पाण्यात पाय ठेवताच घसरला अन् खाली पडून पूलाच्या खाली असलेेल्या पाईपात पाय अडकून पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे अशोक गोपाळ सोनवणे वय 32 रा. तुकारामवाडी, जळगाव या तरुणाचा गुदमरुन मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान मनुदेवी रस्त्यावरील दुसर्‍या क्रमाकांच्या पूलावरुन जात असलेल्या पाण्यात अशोकने मोबाईलमध्ये फोटोही काढला. याचवेळी अशोकला पाण्यात उतरण्यासाठी मित्रांनी विरोधीही केला होता मात्र न त्यांचे न एैकले नाही, अन् काळाने झडप घालून प्राण हिरावले.

मोबाईलमध्ये काढला होता फोटो
तुकारामवाडी येथील अशोक सोनवणे हा मित्र भावेश चौधरी, उल्हास पिंपळकर, सिध्दांत पाटील, उमेश पाटील आणि शरद सोनवणे यांच्यासमवेत मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास मनुदेवी येथे दर्शनासाठी जाण्यास दुचाकीने निघाला. दुपारी 1 वाजेच्या सुमारास मनुदेवी परिसरात सर्व मित्र पोहचले. मनुदेवी पोहचण्यापूर्वी जोरदार सुरु असलेल्या पावसामुळे मार्गात असलेल्या सातही पुलावरुन नदीप्रमाणे पाण्याचा प्रवाह असतो. यातील दुसर्‍या क्रमांकाच्या पूलावर अशोकसह मित्र पोहचले. याठिकाणी अशोकने पाण्यात उभा असतांना त्याच्या मोबाईलमध्ये मित्रांना फोटो काढायला लावला. याचवेळी अशोकने अंघोळीचा आग्रह धरला होता. त्याचा मित्रांनी विरोध केला होता. दरम्यान मोबाईलमध्ये अशोकने काढलेला फोटो त्याचा शेवटचा फोटा ठरला.इ

पूलाखालील पाईपाच्या जोरदार पाण्यामुळे गुदमरला
मित्रांने अंघोळीसाठी विरोध केल्यावर दुचाकीने अशोक तिसर्‍या क्रमांकाच्या पूलावर पोहचला. याचठिकाणी शर्ट काढले आणि पाण्यात उतरला. पाण्यात पाय ठेवताच घसरती जागा असल्याने त्याचा पाय सरकला. पूलावरुनही जोरदार पाण्याचा प्रवाह असल्याने पूलाखालील पाईपातून पाणी निघणार्‍या जागेत पडला. याठिकाणी त्याचा पाईपात अडकला. यावेळी पूलावरुन व पूलाखालील पाईपातून जोरदार पाण्याचा प्रवाह यामुळे गुदमरत असतांना प्रकार मित्रांच्या लक्षात आला. मित्रांनी तत्काळ पाण्यात उतरून अशोकला बाहेर काढले. व थेट किनगाव येथील रुग्णालयात हलविले. तेथून त्याला चारचाकीने जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. कळूस्कर यांनी अशोकला मृत घोषित केले. घटनेची माहिती कळताच तुकारामवाडीतील तरूणांसह नागरिकांनी जिल्हा रूग्णालयात गर्दी केली होती.

अडीच वर्षाचा मुलाचे पितृछत्र हरपले
अशोक हा एका कॅटरिनकडे स्वयंपाकी म्हणून कामाला होता. अशोकचा विवाह झाला त्याला अडीच वर्षाचा कुणाल नावाचा मुलगा आहे. वडीलांच्या मृत्यूने कुणालचे पितृछत्र हरपले आहे. पश्‍चात पत्नी मोनी, आई लिलाबाई, वडील गोपाल सोनवणे, मोठा भाऊ संतोष तसेच एक बहिण असा परिवार आहे. भाऊ संतोष हा सेटींगच्या कामाला जाऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. तर वडील हातमजुरी करतात. अशोकच्या मृत्यूचा कुटुंबियांना धक्का बसला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.