वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना न्याय द्यावा

0

मराठा क्रांती मोर्चातर्फे जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

जळगाव – राज्य शासनाच्या चुकीच्या कारभाराचा मराठा समाजातील विद्यार्थी बळी ठरला आहे. या विद्यार्थ्यांच्या भविष्याचे नुकसान होऊ नये म्हणून प्रवेशासाठी कोटा वाढवुन द्यावा किंवा योग्य तरतूद करून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चातर्फे आज जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मराठा क्रांती मोर्चातर्फे जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उच्च न्यायालयाने कोणतीही स्थगिती देण्यास नकार दिलेला असतांना वैद्यकीय प्रवेशामध्ये १६ टक्के आरक्षण देण्याचा आदेश काढुन मराठा समाजातील विद्यार्थ्यांना अडचणीत आणण्याचे काम सरकारने केले आहे. इडब्ल्युएस आरक्षणाला मराठा समाज राज्याबाहेर प्रवेश आणि सवलत मिळविण्यास पात्र असतांना सरकारने मराठा समाजाला जाणीवपूर्वक त्यातुन वगळुन अडचणी निर्माण केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. राज्यात आणि देशात कुठेही तरूणांना प्रवेशासाठी संधी मिळणार नसल्याने त्यांचे भविष्य संकटात आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून कोटा वाढवुन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चातर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे विनोद देशमुख, अ‍ॅड. अनिल पाटील, अ‍ॅड. सचिन चव्हाण, योगेश पाटील, अजित पाटील, प्रमोद पाटील, कृष्णा पाटील, नंदुआप्पा पाटील, किरण पाटील, अ‍ॅड. विजय पाटील, राजेश पाटील, दिपक पाटील, सागर पाटील, हेमंतकुमार साळुंखे, हरीष पाटील, केतन पाटील, रामधन पाटील, प्रा. राजेंद्र देशमुख, विठ्ठल पाटील आदी उपस्थित होते.