लातूर-मराठा आरक्षणप्रकरणी मराठा समाजाने आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या 9 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा निर्णय मराठा मोर्चाच्या आज लातूर येथे आयोजित बैठकीमध्ये घेण्यात आला. दरम्यान आज पुण्यात देखील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. ९ ऑगस्ट पर्यंत मागणी मान्य न झाल्यास गनिमी काव्याने उत्तर देऊ असा इशारा देखील पुण्यातील आंदोलनादरम्यान देण्यात आला आहे.