मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन

0

मुंबई-मराठा आरक्षणासंदर्भात नागपूर येथे मुख्यमंत्र्यांसोबत सर्व पक्षीय नेत्यांची बैठक आज शनिवारी पार पडली. या बैठकीत आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलावण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नागपूरमध्ये सध्या राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पार पडले. दरम्यान, राज्यात मराठा आंदोलन सुरु असल्याने यावर चर्चेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात विविध महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.