बीड-औरंगाबादमध्ये मराठा आरक्षणासाठी प्रमोद होरे-पाटील या तरुणाने आत्महत्या सोमवारी केल्याची घटना काल घडली होती. त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी केज तालुक्यातील विडा येथील अभिजित बालासाहेब देशमुख (30) याने मंगळवारी सकाळी घराजवळील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मराठा आरक्षणासाठी हा राज्यातील सातवा आणि बीड जिल्ह्यातील पहिला बळी आहे. विज्ञान शाखेचा पदवीधर असलेल्या अभिजितची कौटुंबिक परिस्थिती सामान्य होती. कुटंबियांवर कर्ज होते. यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे चिठ्ठीवरुन समोर आले.
संपूर्ण जिल्ह्यात ही घटना वार्यासारखी पसरली. यानंतर जिल्हाभरातून मराठा समाज बांधवांनी विड्याकडे धाव घेतली आहे. दुसरीकडे संतप्त गावकर्यांनी अभिजित देशमुख याचा अंत्यसंस्कार विधी रोखला आहे.