भाजपला मोठा धक्का: मराठवाड्यातील माजी केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा

0

बीड: माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भाजपला मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर आता मराठवाड्यात आणखी भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड-पाटील यांनी भाजपला रामराम केला आहे. जयसिंगराव गायकवाड यांनी भाजप पक्ष सद्स्यत्त्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे आज मंगळवारी सकाळी दिला आहे.

मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी ते भाजपकडून इच्छुक होते, मात्र भाजपने शिरीष बोराळकर यांना उमेदवारी दिली आहे, त्यामुळे त्यांनी नाराज होऊन राजीनामा दिला आहे. पदवीधर निवडणुकीवेळीच त्यांनी राजीनामा दिल्याने भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे. जयसिंगराव गायकवाड यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, अआज माघारीची शेवटची मुदत आहे ते अर्ज मागे घेणार किंवा कोणत्या पक्षात प्रवेश करणार? याकडे आता लक्ष लागेले आहे. जयसिंगराव गायकवाड पूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात होते, ते पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी चर्चा सुरु आहे. बीड जिल्ह्याचे त्यांनी नेतृत्त्व केले होते.