पुणे :- अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्या गाडीला सकाळी लोणावळ्यात अपघात झाला. ‘मस्का’ या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी कोल्हापूरला जात असतानाच हा अपघात झाला. या अपघातामध्ये प्रार्थनाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे, तर अनिकेत विश्वासराव सुखरूप आहे. यामध्ये प्रर्थानाच्या असिस्टंच्या डोक्याला मार लागला आहे.
हे देखील वाचा
आज सकाळी ‘मस्का’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोल्हापूरला जात असतांना मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील लोणावळ्याच्याच रस्त्यावर असतेवेळी एका टेम्पोला वाचवण्यासाठी चालकाने कार वळवली व चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला. या अपघाताची माहिती अभिनेता अनिकेत विश्वासराव याने दिली आहे. अपघातावेळी अनिकेत हा समोरच्या सीटवर बसलेला होता. त्याला झोप लागली होती. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. चित्रपटाच्या प्रसिद्धीदरम्यान झालेला हा अपघात लक्षात घेता आता प्रार्थनाला पुढील काही दिवस आराम करण्याची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे.