मुंबई: मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिचे फेसबुक अकाऊंट हॅक झाले आहे. खुद्द तेजश्री प्रधानने याबाब ट्विटकरून माहिती दिली आहे. (ब्लू टीक) निळी खूण असलेले माझे फेसबुक अकाऊंट पुन्हा एकदा हॅक झाले आहे. या अकाऊंटवर काही पोस्ट करण्यात आले तर ती मी नसेन. संबंधित हॅकरविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल’,असे ट्विटमध्ये तेजश्रीने केले आहे.
सेलिब्रिटींचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक करण्याचा प्रकार वाढला आहे. सायबर सेलकडे तक्रार केल्यानंतर हॅकर्सवर कारवाई देखील करण्यात आली आहे. सेलिब्रिटींचे अकाऊंट हॅक करून त्यावरून अनेकांना खोटे मेसेज पाठवणे, आक्षेपार्ह स्टेटस टाकणं, अश्लील फोटो पोस्ट करणं असे प्रकार हॅकर्सकडून करण्यात येतात. त्यामुळे अशा हॅकर्सविरोधात कठोर कारवाईची मागणी होते आहे.